Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गाव आदर्श करण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी: आदर्श तिलक स्वामी

Mahesh Patil by Mahesh Patil
June 8, 2022
in सामाजिक
0
गाव आदर्श करण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी: आदर्श तिलक स्वामी

म्हसावद l प्रतिनिधी
जोपर्यंत कुटुंबात एकत्र बसून चांगले विचार जोपासत नाही तो पर्यंत तुमचे गाव आदर्श होणार नाही तुम्हाला गाव आदर्श करण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल त्यासाठी गाव तालुका जिल्हा आदर्श होईल या दृष्टिकोनातून गाव आदर्श करण्यासाठी गावागावात व्यसनमुक्ती चा संकल्प वृक्षतोड थांबवत वृक्षलागवड व त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.

याचे उदाहरण म्हणजे गुजरात सरहद्दीवरील शहादा तालुक्यातील बहिरपुर, पुरुषोत्तम नगर, बामखेडा गावाने केलेले काम हे कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन आदर्श तिलक स्वामी यांनी केले
कुकरमुंडा तालुक्यातील सदगव्हाण (गुजरात) येथे स्वामीनारायण मंदिरात प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव निमित्त माझे गाव आदर्श गाव तसेच आदर्श पोलीस पाटील यांच्या सन्मान व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी कोठारी उत्तमप्रकाश, स्वामी पूजनीय पूर्णदर्शन, स्वामी आदर्श तिलक, स्वामी ध्यान जीवन, स्वामी भूषण स्वामी, नारायणप्रिय स्वामी वेदभगत मैत्री आदी संत-महंत उपस्थित होते.

यावेळी स्वामी पुढे म्हणाले, प्रमुख स्वामी महाराजांनी मानवी समाजापुढेउच्च मूल्य स्थापित करताना मानवी समाजापुढे जेव्हा-जेव्हा नैसर्गिक आपत्ती त्याचे उदाहरण म्हणजे गुजरातचे भूकंप आतंकवाद्यांनी मंदिरावर गोळीबार हल्ले कळविले होते व ज्या व्यसनाधीन झालेल्या गावांना नैसर्गिक आपत्तींना प्रमुख स्वामिनी सत्संगी समुदायाला मदत करण्याचे विचार दिले ते स्वतः सामाजिक कामात अग्रेसर राहिले.

पूर्ण देशात आध्यात्मिक विकास व्हायला हवी आदर्श गावांनी तर खरच विकसित देश बनवा समाजात व्यसनमुक्ती होणे गरजेचे आहे माझे गाव आदर्श गाव माझे गाव व्यसनमुक्त गाव याची संकल्पना करा असे आवाहन यावेळी आदर्श तिलक स्वामी यांनी केले वेद भगत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सत्संगी भाविक पंचक्रोशीतील भाविकांना केले.

पुरुषोत्तमनगर ग्रामसेवक शरद पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचे अनेक माझ्या गावाला पुरस्कार मिळवताना प्रत्येक नागरिकांची गाव आदर्श होण्यासाठी बोलायची साथ मिळाली त्यामुळेच आदर्श गावाचा सन्मान मिळतो महाराष्ट्र शासनाच्या सन्माना पेक्षा संतांच्या हस्ते धार्मिक कार्यक्रमात सत्कार होतो हा एक माझ्या गावासाठी अभिमानास्पद बाब असून तो गावासाठी सुवर्ण दिवस आहे कधीही विसरू शकत नाही.

महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष बापू पाटील म्हणाले गावातील तंटे गावातच मिटवण्यात गावात सुखशांती नांदते त्यामुळे गावाचे नाव लौकिक होते तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कार मिळतो त्या पुरस्कारांपेक्षा सन्मान पेक्षाही प्रमुख स्वामींच्या शताब्दी महोत्सवात आदर्श पोलीस पाटील म्हणून सन्मान होणे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे.

कार्यक्रमाची प्रस्तावना महेंद्रभाई पटेल यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सदगव्हाण येथील युवा व ग्रामस्थ बंधू-भगिनी सत्संगी भाविकांनी परिश्रम घेतले

सन्मान केलेले ग्रामपंचायती, पोलीस पाटील, भागवत सेवा समिती
बहिरपुर पुरुषोत्तमनगर ग्रामसेवक शरद पाटील, बामखेडा येथील सरपंच मनोज चौधरी, उपसरपंच व ग्रामसेवक तसेच आदर्श पोलीस पाटील म्हणून वडाळी येथील गजेंद्र गोसावी व धानोरा बापू पाटील व भागवत सेवा समिती धानोरा साधुसंतांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर बहीरपुर सरपंच कस्तुरा पवार, ग्रामसेविका कविता गवळे पुरुषोत्तमनगर सरपंच प्रतिनिधी वंदना चव्हाण या महिलांचा सन्मान स्वामी नारायण संस्थान सदगव्हाण सरपंच प्रतिभा मराठे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाची क्षणचित्रे

लहान लहान सत्संगी बालक अगदी नियमांचे काटेकोरपणे पालन करत येणाऱ्या भाविकांची सेवा करत होत.

आलेल्या संत महंतांना पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायतीची शासनाची मिळालेले पुरस्कार चीमाहिती पुस्तिका भेट म्हणून स्वामी दारात संस्थांना देण्यात आली.

गुजरात व महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांना भोजन महाप्रसाद दोडे गुजर संस्थांनचे माजी अध्यक्ष वृंदावन पटेल तर मंडप व खुर्च्यांची व्यवस्था यशवंत पटेल शहादा यांच्याकडून करण्यात आली त्यांचाही सन्मान व सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

सिसा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

Next Post

नंदुरबारला 12 जून रोजी जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा

Next Post
नंदुरबारला 12 जून रोजी जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा

नंदुरबारला 12 जून रोजी जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

October 17, 2025
वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

October 17, 2025
गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

October 17, 2025
एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group