तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील उमरी शिवारात आढळली ती तीन पिल्ले बिबटची नसून रानमांजराची आहेत अशी माहिती तळोदा आर.एफ.ओ निलेश रोढे यांनी दिली.
दि.७ जून २०२२ रोजी तळोदा तालुक्यात असलेल्या मोहिदा गावातील शेतकरी उद्धव बाबू पाटील यांच्या मोहिदा गावालगत असलेल्या उमरी शिवारातील शेतामध्ये ऊस तोड सुरू असताना कामगारांना अचानक काहीतरी आवाज आल्याचे जाणवले मजुरांनी आत जाऊन पाहिले असता त्यांना ३ पिल्लं त्या ठिकाणी आढळले.
हि पिल्लं त्यांनी लांबूनच न्याहाळली त्यामुळे ही बिबट्याची पिल्लं असावेत असा त्यांचा समज झाला. म्हणून त्यांनी शेतकरी उद्धव बाबू पाटील यांना याबाबत सूचित केले. त्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता त्यांना ही ३ पिलं त्या ठिकाणी दिसले पण ते त्यांनी लांबूनच न्याहाळले.
ऊस तोडणाऱ्या मजुरांनी ही लांबूनच त्या पिल्लांना पाहिले म्हणून त्यांना असे वाटले की ही बिबट्याची पिल्लं असावीत असा समज केला.
याबाबत शेतकरी उद्धव पाटील यांनी तातडीने तळोदा येथील वनविभागाला कळविले असता वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांनी आपल्या पथकासह याठिकाणी भेट दिली भेट देऊन पाहणी केली. त्यांनी त् पिलांना बाबत सर्व चौकशी केली असता.ही पिल्लं ४ ते ५ दिवसापूर्वी जन्माला आल्याचं त्यांनी सांगितलं. व त्या पिल्लांना त्यांच्या आईला भेटता यावे म्हणून सर्व व्यवस्था त्याठिकाणी निर्माण केली.
नेमकी ही पिल्लं कोणत्या प्राण्याची आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे ही लावलेत.जेणेकरून सर्व बाब निदर्शनास येईल.
उपस्थित मजूर व शेतकऱ्यांशी चर्चा करून वनविभागाचे आपल्याला नेहमी सहकार्य असेल त्यामुळे घाबरून न जाता आपले दैनंदिन कामे शेतकऱ्यांनी करावेत असे ही सांगितले.
वरील घटनेबाबत काल मला सूचना मिळाली की उमरी शिवारामध्ये बिबट्याची पिल्ले आढळली आहेत.त्यामुळे मी माझ्या सहकार्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता असे निदर्शनात आले की ही पिल्लं बिबटची नसून रानमांजराची आहेत.कारण बिबटची पिल्लं ही आकाराने लहान असतात व त्यांच्या अंगावर काळी टिपके असतात.परंतु असे मला काहीही आढळले नाही अशी माहिती तळोदा आर.एफ.ओ निलेश रोढे यांनी दिली.