नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील श्रावणी गावात बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात पिताचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली घडली आहे.
स्थानिक गावकऱ्यांनी दिलेली माहिती अनुसार नवापुर तालुक्यातील श्रावणी गावात रविवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास श्याम आसाराम कोकणी( वय अंदाजे 45 )हे आपले मुला सोबत शेतीच्या काम आटपून
आपल्या घरी श्रावणी गावात दाखल झाले असता नंदुरबारच्या दिशेने जाणारी बोलेरो वाहन (क्र. एम. एच.३९ जे.६७७९) ने दुचाकी वाहन (क्र.एम.एच. ३९, ए.एफ.५८५२) ला जोरदार धडक दिल्याने दोघे पिता-पुत्र रस्त्यावर जोरदार आदळल्याने गंभीर जखमी झाले होते.
अपघात होताच स्थानिक गावकऱ्यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेत असून त्यांना त्याच बोलेरो वाहनाद्वारे ग्रामीण रुग्णालयात खांडबारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पिता-पुत्र दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना 108 ॲम्बुलन्सद्वारा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते.
परंतु उपचारादरम्यान रात्री श्याम कोकणी यांच्या मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा राहुल श्याम कोकणी जखमी असून त्याच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नंदुरबार विसरवाडी रस्त्यावर अपघाताची प्रमाण मोठ्या संख्या ने वाढल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे व प्रशासनाने यासाठी योग्य उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे.