नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील कुवरखेतचा बुकलीपाडा येथे क्रिकेट टीम हरली म्हणून एकाच्या डोक्यात कुऱ्हा डीने डोक्यात मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील कुवरखेतचा बुकलीपाडा येथे राहणाऱ्या राजेंद्र सुकलाल पावरा याची क्रिकेट टीम हरली म्हणून त्याने धारासिंग विका वसावे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वर करून दुखापत केली.
तसेच संतोष सुकलाल पावरा शिवीगाळ करीत जीव ठार मारण्याची धमकी दिली म्हणून धारासिंग विका वसावे रा . कुवरखेतचा बुकलीपाडा ता . धडगाव यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलिस ठाण्यात राजेंद्र सुकलाल पावरा, संतोष सुकलाल पावरा दोन्ही रा . कुवरखेत बुकलीपाडा ता . धडगाव यांच्या विरुद्ध भांदवि कलम ३२६,५०४,५०६,३ ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोना योगेश निकम करीत आहेत.