Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारात ‘महाज्योती’तर्फे उद्या ‘तृतीय रत्न’ नाटकाचा नि:शुल्क प्रयोग, रंगमंचावरील पहिले समाजिक क्रांतीकारी नाटक

team by team
June 7, 2022
in सामाजिक
0
नंदुरबारात ‘महाज्योती’तर्फे उद्या ‘तृतीय रत्न’ नाटकाचा नि:शुल्क प्रयोग, रंगमंचावरील पहिले समाजिक क्रांतीकारी नाटक

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात बुधवार 8 जून 2022 रोजी सायंकाळी सात वाजता ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे, असे नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) व्यवस्थापकीय संचालकांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘महाज्योती’चे अध्यक्ष विजय वडेट्टीवार,

संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोग करण्याचे योजिले आहे.

अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून क्रिएटिव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. एकुण 30 कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे.

याआधी विविध जिल्ह्यात 30 प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उत्फूोगर्त असा प्रबोधनात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सदर नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वसईकर दाम्पत्यांच्या पाठपुराव्याने 800 लाभार्थ्यांना मिळाला विविध योजनांचा लाभ

Next Post

क्रिकेट टीम हरली म्हणून चक्क एकाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
आरोग्य विभागाचे कार्यालय फोडून संगणक लांबविले

क्रिकेट टीम हरली म्हणून चक्क एकाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add