Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वसईकर दाम्पत्यांच्या पाठपुराव्याने 800 लाभार्थ्यांना मिळाला विविध योजनांचा लाभ

team by team
June 7, 2022
in राजकीय
0
वसईकर दाम्पत्यांच्या पाठपुराव्याने 800 लाभार्थ्यांना मिळाला विविध योजनांचा लाभ

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील भाजपाच्या नगरसेविका संगिताताई वसईकर व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रभागातील 800 हुन अधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन दिला आहे.

यामुळे वंचित लाभार्थ्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव कार्यक्रमातून दिसून आले. या योजनांच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी वितरण करण्यात आले आहे.

नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील निराधार, कामगार व वयोवृध्द विविध योजनांच्या लाभांपासुन वंचित होते. प्रभागातील नगरसेविका संगिताताई वसईकर व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर यांनी स्वतः घरोघरी जावुन लाभार्थ्यांची माहिती गोळा केली.

तसेच संसदरत्न खा.डॉ.हिना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, अमळनेरचे माजी आ.शिरीष चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करुन संतोष वसईकर यांनी शासन दरबारी सादर केले. त्यांना मंजुर मिळवुन दिली आहे.

त्यात उज्ज्वला गॅस योजनेचे 260, बांधकाम मजूर कामगार 350, खावटी अनुदान योजना 150, अनेकांना नवीन रेशनकार्ड तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृध्दापकाळ योजना, अपंग अनुदान योजना अशा विविध योजनेतील सुमारे 800 हून अधिक लाभार्थ्यांचा समावेश आहे.

केंद्रातील मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नंदुरबार शहरातील चव्हाण चौकात लाभार्थ्यांचा भव्य मेळावा घेण्यात आला. यावेळी खा.डॉ.हिना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, अमळनेरचे माजी आ.शिरीष चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली.

याप्रसंगी जि.प.सदस्या डॉ.सुप्रिया गावित, पालिकेतील भाजपाचे गटनेते अ‍ॅड.चारुदत्त कळवणकर, नगरसेविका संगिता वसईकर, नगरसेवक गौरव चौधरी, नगरसेवक प्रशांत चौधरी, भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र माळी, महिला शहराध्यक्षा योगिता बडगुजर आदी उपस्थित होते.

नगरसेविका संगिता वसईकर व संतोष वसईकर हे दाम्पंत्य महात्मा फुले जीवनदायी योजना असो, रात्री बेरात्री गरीबांसाठी मदत असो, रुग्णालयाचे कोणतेही काम असो, अशावेळी स्वतः पुढाकार घेवुन धावुन जात असतात. आतापर्यंत जीवनदायी योजनेमार्फत अनेक रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच कोरोना संकट काळात देखील गोरगरीबांना मदतीचा हात दिला आहे. म्हणुन वसईकर दाम्पंत्य हे गोरगरीबांचे मसिहा व संकटसोबती देखील आहेत, असा गौरवोद्वार काढत उद्योगपती प्रा.डॉ.रविंद्रबापु चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी चांगले काम केल्याचेही कौतूक खा.डॉ.हिना गावित, आ.डॉ.विजयकुमारज गावित, अमळनेरचे माजी आ.शिरीष चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी भाषणातून काढला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार भाजपा अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाला चौधरी, गोकुळ भोई, आबा कुंभार, सुनिल चौधरी, वसंत वसईकर, कांतीलाल वसईकर, मधुकर शेलार, महेंद्र मोरे, शुभम वसईकर, शेखर वसईकर, सनी वसईकर आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

विधान परिषदेसाठी आमशा पाडवी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईत दाखल

Next Post

नंदुरबारात ‘महाज्योती’तर्फे उद्या ‘तृतीय रत्न’ नाटकाचा नि:शुल्क प्रयोग, रंगमंचावरील पहिले समाजिक क्रांतीकारी नाटक

Next Post
नंदुरबारात ‘महाज्योती’तर्फे उद्या ‘तृतीय रत्न’ नाटकाचा नि:शुल्क प्रयोग, रंगमंचावरील पहिले समाजिक क्रांतीकारी नाटक

नंदुरबारात ‘महाज्योती’तर्फे उद्या ‘तृतीय रत्न’ नाटकाचा नि:शुल्क प्रयोग, रंगमंचावरील पहिले समाजिक क्रांतीकारी नाटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add