धडगाव ! प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील काकडदा या गावात ग्रामस्थांच्या पुढाकारातुन विश्व आदिवासी दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी गावाचे पोलीस पाटील गुंजा-या पाडवी यांच्या हस्ते.आदिवासी कुलदैवत याहा मोगी माता, आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा, तंट्या भिल, विर एकलव्य,आदि दैवतांचे प्रतीमेच पूजन करण्यात आले.
त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालया पासून जिल्हा परीषद शाळेपर्यंत पारंपारीक वेशभुषेत ढोल नृत्य सादर करून रॅली काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मंडळी व महीला मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.जिल्हा परीषद शाळेत पोहचल्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर करण्यात आले. व त्यानंतर गावाचे पोलीस पाटिल गुंजा-या पाडवी यांनी आदिवासी क्रांतीकारकांची थोडक्यात इतिहास सांगीतली व वृक्ष संवर्धन आणि कोरोना लसीकरण आदी विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी गावाचे सरपंच सिता पाडवी, माझी सरपंच रेहंज्या पाडवी , रामा पाडवी, आपसिंग पाडवी, आमशा पाडवी, रमेश मोरे, उत्तम मोरे, धनसिंग पाडवी, रुमाल्या वळवी ,गावाचे जेष्ठ नागरिक, पुजारी,आदिवासी कर्मचारी, ग्रामस्थ, युवक, शाळेचे विद्यार्थी आदि बांधव कार्यक्रमाला उपस्थिती होते.