नंदुरबार ! प्रतिनिधी
खोंडामळी येथील रहिवासी यश पाटील यांची क्षत्रिय मराठा परिवार नंदुरबार जिल्हा विद्यार्थी प्रमुख पदी निवड करण्यात आली. क्षत्रिय मराठा परिवार संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब पाटील व सर्व प्रदेश कार्यकारणीतर्फे ही निवड करण्यात आली.
यश पाटील या पूर्वी क्षत्रिय मराठा परिवारात नंदुबार संघटक म्हणून कार्यरत होते.या यशाबद्दल उत्तर महाराष्ट्र कार्यकारी प्रमुख भाऊसाहेब पाटील,उत्तर महाराष्ट्र व्यवसाय समितीचे अध्यक्ष महेश पाटील, उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष रामकृष्ण बोरसे, जळगाव जिल्ह्याचे पर्यटन प्रमुख हेमंत पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सयाजी पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे युवा प्रमुख नितेश पंगारे, नंदुरबार जिल्ह्याचे उपाध्यक्ष विपुल मराठे, नंदुरबार तालुका अध्यक्ष राकेश बेहेरे, नंदुरबार जिल्ह्याचे शिक्षक उपप्रमुख जगदीश पाटील व क्षत्रिय मराठा परिवार उत्तर महाराष्ट्राचे पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे .
Thanks Bhai