Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतात वीजजोडणी करण्यासाठी २७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी,विज वितरणच्या वायरमनसह खाजगी वायरमनला अटक

team by team
June 4, 2022
in क्राईम
0
शेतात वीजजोडणी करण्यासाठी २७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी,विज वितरणच्या वायरमनसह खाजगी वायरमनला अटक

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार येथील एकाच्या भोणे शिवारातील शेतात वीज कनेक्शन घेण्यासाठी ३० हजाराची लाच मागून तडजोडी अंती २७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना खाजगी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली असून याप्रकरणी वीज वितरण विभागाच्या वायरमनला ही अटक करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या भोणे ता.नंदूरबार शिवारात शेत असून, शेतात वीज कनेक्शन घ्यावयाचे असल्याने तकारदार यांनी एम.एस.ई.बी. कार्यालय , नंदुरबार येथे ऑक्टोबर २०२१ मध्ये डिमांड नोट

मिळणेकरीता ऑनलाईन अर्ज केला होता . त्यानंतर तकारदार यांनी वारंवार एम.एस.ई.बी. कार्यालयाशी संपर्क साधला असता वायरमन अनिल मांगडु भोये यांनी खाजगी वायरमन देवा मराठे यांच्या मार्फत ३० हजार लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २७ हजार ५०० रुपये त्यात १५ हजार रु . डिमांड नोटचे व १२ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली.

दरम्यान तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले खाजगी वायरमन देवा मराठे यांनी २७ हजार ५०० रुपये पंच साक्षीदारांसमोर स्वीकारले.याप्रकरणी देवानंद ऊर्फ देवा पंडित मराठे ,खाजगी वायरमन , रा . रजाळे ता . जि.नंदुरबार व म.रा.वि.वि.कंपनीचे वायरमन
अनिल मांगडु भोये , रा . सिध्देश्वर नगर , कोकणीहिल , दुधाळे शिवार , ता . जि . नंदुरबार यांना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे .

सदर कामगिरी पोलीस उपअधीक्षक राकेश आनंदराव चौधरी , पोलिस निरीक्षक समाधान महादु वाघ , पोलीस निरीक्षक श्रीमती माधवी एस . वाघ , पोहवा विजय ठाकरे , पोना /अमोल मराठे , पोना देवराम गावीत , नावाडेकर , पोना मनोज अहिरे , चापोना जितेन्द्र महाले अँन्टी करप्शन ब्युरो , नंदुरबार थकाने केली आहे .

भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागन्या लोवसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , नंदुरबार कार्यालयास संपर्क करावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक राकेश आनंदराव चौधरी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गुरव समाज तरुणांना एकत्र आणण्यासाठी नंदुरबार गुरव समाजकडून क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन, तळोदा संघाने मारली बाजी

Next Post

पिकअप पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यू , तीन जण जखमी

Next Post
पिकअप पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यू , तीन जण जखमी

पिकअप पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यू , तीन जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add