शहादा ! प्रतिनिधी
शहादा शहरातील सोनार गल्लीत राहणारे कुटुंब नंदुरबारकडे जात असताना प्रकाशा रोडवरील राजरंग हॉटेलच्या पुढे समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने ठोस दिल्यामुळे वाहनात बसलेल्या सोनार कुटुंबातील पाचही जण जखमी झाले आहेत . जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . दरम्यान , ट्रॉला चालकास अटक करण्यात आली .
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा शहरातील सोनार गल्लीतील सराफ प्रसाद सतीष सोनार ( वय ५२ ) हे पत्नी रक्षा प्रसाद सोनार ( वय ४८ ) , आई भारतीबाई सतीष सोनार ( वय ७२ ) , मुलगा दश प्रसाद सोनार व मुलगी दर्शिका प्रसाद सोनार हे सकाळी पावणे बाराच्या दरम्यान नंदुरबारकडे कारने ( एम.एच -०४ , सीझेड- १७ ९ ४ ) निघाले असता प्रकाशा रस्त्याकडे वाहन जात असताना राजरंग हॉटेलच्या लगत प्रकाशाकडून भरधाव येणाऱ्या ट्रॉलाने ( पी.बी १३ , बी.एफ – ९ ८२७ ) हा वेगाने येत धडक दिली . यात सोनार कुटुंब जखमी झाले . भारतीबाई सतीश सोनार यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे २० टाके लावण्यात आलेले आहे.तसेच प्रसाद सोनार यांच्या पत्नी रक्षाबाई मुलगा दश व मुलगी दर्शिका यांच्या डोक्याला हाताला मार लागला आहे. तर प्रसाद सोनार यांच्या उजव्या पायाला जबर मार लागल्यामुळे फॅक्चर झालेला आहे तर डोक्याला मार लागलेला आहे .