नवापूर ! प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भरत गावीत, नगरसेवक नंदु गावीत हे होते. यावेळी भरत गावित यांनी आदिवासी समाजासाठी बलिदान देणारे क्रांतिकारी यांचे विचार मांडले ,शासनाच्या योजना तर आहेत , परंतु या देशासाठी आदिवासी क्रांतीकारक यांनी लढा देत समाजाला न्याय मिळवून दिला.
यावेळी युवा नेते धनंजय भरत गावीत , जि.प.सदस्या श्रीमती.संगीताताई गावीत, श्रीमती पुष्पाताई गावित, सरपंच श्रीमती उषाताई गावीत, उपसरपंच लाजरस गावीत , विष्णू महाराज, बापु गावीत, राकेश गावीत ,जसू गावीत तंटामुक्त अध्यक्ष सुका गावीत ,शाळेचे मुख्याध्यापक श्री.मुंडे , एकलारे , काळळे आप्पा , के.डी गावीत , गावातील समाज बांधव उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.