Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कुपोषित बालकांच्या पोषण आहारात स्थानिक अन्न घटकांचा समावेश करा-ॲड. के.सी.पाडवी

team by team
August 10, 2021
in राज्य
0
कुपोषित बालकांच्या पोषण आहारात स्थानिक अन्न घटकांचा समावेश करा-ॲड. के.सी.पाडवी
नंदुरबार ! प्रतिनिधी
कुपोषित बालकांवर उपचार करताना त्यांचा आहारावर विशेष लक्ष द्यावे आणि आहारात गावरान अंडी, मोहफुलांपासून बनविलेले पदार्थ, स्थानिक तांदूळ आणि  भगरीसारख्या पौष्टिक अन्न घटकांचा आहारात समावेश करावा , असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड..के.सी.पाडवी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत  आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहायक जिल्हाधिकारी मैनक घोष, मीनल करनवाल, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, मोहफुलपासून तयार केलेले पदार्थ आणि भगरीची लापशी बालकांना देण्यात यावी. या दोन्हीमध्ये  आवश्यक अन्नघटकांचे प्रमाण जास्त असते. गावरान कोंबड्यांच्या अंड्यातही पौष्टीक घटकांचे प्रमाण जास्त असते. पोषण अहारात या घटकांचा उपयोग केल्याने मुलांचे पोषण चांगल्यारितीने होईल.
बालकांवर अशा स्वरुपाच्या पोषण आहाराचा परिणाम तपासण्यासाठी प्रायोगिक तत्वावर  तीन महिने 50 बालकांना पारंपरिक आहार आणि 50 बालकांना नव्या घटकांचा समावेश असलेला आहार देण्यात यावा. बालकांच्या वजनात दर आठवड्यात होणाऱ्या बदलांची नोंद करण्यात यावी. नवापूर, तळोदा परिसरात स्थानिक तांदळाच्या उपयोग करावा. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास त्या आधारे व्यापक उपाययोजना राबविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधीदेखील उपलब्ध करून देण्यात येईल.
 कुपोषणाचा प्रश्न सामाजिक असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागरिकांनाही या समस्येबाबत अधिक जागरूक करावे लागेल. जिल्ह्यातून कुपोषण कायमचे घालविण्यासाठी कुपोषित बालकांचे वजन वाढल्यानंतरही काही काळ त्यांच्या प्रकृतीविषयी नोंद ठेवण्यात यावी. बाल विवाह होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. गरोदर मातांच्या आहार आणि आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावे. आरोग्य आणि बालविकास विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कुपोषण कमी करण्यासाठी गांभिर्याने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्रीमती वळवी म्हणाल्या, मातांना  पौष्टीक आहाराचे महत्व समजावून सांगावे. अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्यात बैठक घेऊन कुपोषण कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घ्यावा. स्थानिक पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश केल्याने त्याचा मुलांना चांगला फायदा होऊ शकेल.
श्रीमती खत्री म्हणाल्या, स्थानिक अन्नपदार्थांची शरीराला सवय असल्याने त्यांचा परिणाम लवकर होतो. बालकांना पोषण आहार देतांना त्यात  विविध घटकांचे संतुलन राहील याची दक्षता घ्यावी. पोषण आहारासाठीच्या अनुदानातून स्थानिक पदार्थांचा समावेश आहारात करावा. चांगल्या आणि यशस्वी प्रयोगांची माहिती राज्यस्तरावर पोहोचवली जाईल. कुपोषण कमी करण्यासाठी आरोग्य आणि बालविकास  विभागाने समन्वय ठेवून उपाययोजना राबवाव्यात असे त्यांनी सांगितले.
पुढील तीन महिन्यात मोहिम स्तरावर कुपोषण कमी करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे. संवेदनशीलतेने नव्या प्रयोगाची अंमलबजावणी करताना बालकांच्या आरोग्याला विशेष महत्व द्यावे, असे श्री.गावडे म्हणाले.
बैठकीला आरोग्य अधिकारी,  बालविकास अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील पाच तालुके झाले तुर्त कोरोनामुक्त, नंदुरबार तालुक्यात फक्त एक कोरोना रूग्ण

Next Post

धुळीपाडा येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा

Next Post
धुळीपाडा येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा

धुळीपाडा येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add