नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या 43 वर्षांपासुन रखडलेला दहेली प्रकल्प अखेर पुर्णत्वास आला असून घळभरणीचे काम अंतिम टप्प्यात असून यंदा पाणीसाठा जमा केला जाणार अशी माहिती मुख्य अभियंता तुषार चिनावलकर यांनी दिली.
गेल्या 43 वर्षांपासुन रखडलेला दहेली प्रकल्प पुर्णत्वास आला आहे. या प्रकल्पाच्या घळभरणीचे काम पुर्ण झाल्याने यंदा यात पाणी साठा केला जाणार आहे.

1979 साली या धरणाच्या कामाला 03 कोटी 95 लाखांचीं मान्यता मिळाली होती. 1986 साली प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली मात्र पुर्नवसनांच्या विरोधामुळे रखडलेल्या या धरणाचे काम आता 246 कोटींवर गेले आहे.
धरणासाठी 202 हेक्टरचे भुसंपादन झाले असुन 392 कुटुंबाचे विस्थापण झाले आहे. या धरणात 19.08 घल घमी साठा होणार असुन यामुळे 35 गावांतील 3065 हेक्टर सिचंन क्षेत्राखाली येणार आहे अशी माहिती मुख्य अभियंता तुषार चिनावलकर यांनी दिली.








