म्हसावद l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे पुरस्क्रुत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंन्द्र (MCED) नंदुरबार द्वारा आयोजित बार्टी द्वारे स्थापित अनुसुचित जातीतील युवक-युवतींकरिता १ महिना कालावधीचा मोफत (अनिवासी) उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदीर या ठिकाणी दि.२ जुन ला मुलाखत घेवुन आवश्यक कागदपत्र तपासणी करुन निवड करण्यात येणार व दि.६ जुन ते ५ जुलै या दरम्यान रोजगार व व्यवसायाविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहेे.
तरी सर्व अनुसुचित जातीतील उमेदवारांनी सदर मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अव्हान हे शहादा तालुका समन्वयक (समतादुत) जयश्री कढरे व करणकाळे हेमंत या बार्टीच्या समतादुतानं मार्फत करण्यात येत आहे ह्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन अ.प्र.अधिकारी मिनाक्षी दांडवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.








