म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गणपत लोटन माळी तर व्हा चेअरमन पदी नथा रामदास रोकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ची निवड प्रक्रिया आज दिनांक 28 मे रोजी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी बी.एल. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यात चेअरमन पदी गणपत लोटन माळी व्हाईस चेअरमन पदी रामदास रोकडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक मोहन रोहिदास पटेल, लालचंद भटा माळी, अशोक ईश्वर माळी, राकेश काशिनाथ धनगर,
अशोक जगताप, आनंदा बुधा माळी, अनुसयाबाई जयराम माळी, कमलबाई हिरामण माळी, सुरेशगिर झुलालगिर गोसावी, गणेश भीमराव माळी यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी निवड बिनविरोध होण्यासाठी समता परिषदेचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे ग्रामपंचायत सदस्य कैलास नामदेव माळी, लालचंद भटा माळी, भाऊसाहेब गणपत माळी, दगा धाकु माळी,
नाना चिधा माळी, अशोक जगताप, नथा रोकडे, नाना मिस्तरी, निंबा रोहिदास माळी, भूषण अहिरे, धीरज माळी, मनोहर गणपत अहिरे, राकेश काशिनाथ धनगर, अशोक ईश्वर माळी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव रतन वाघ आदीनी प्रयत्न केला.








