Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना टाळून शिवसेना वाढविणे अशक्य : खा.राजेंद्र गावीत

team by team
May 29, 2022
in राजकीय
0
नंदूरबार जिल्ह्यात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना टाळून शिवसेना वाढविणे अशक्य : खा.राजेंद्र गावीत

नंदुरबार l प्रतिनिधी
देशात महागाई गगनाला भिडली असून यात नागरीक होरपळले जात आहे. या मुद्यांवरून ध्यान हटविण्यासाठी भोंगा ज्ञानवापी सारखे प्रकरणे भाजपा बाहेर काढत आहे.

यामुळे नागरीकांमध्ये असंतोष निर्माण होवून त्याचा स्फोट होवून भाजपा नेस्तनाबुत होईल. तसेच नंदुरबार जिल्ह्यात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना टाळून शिवसेना वाढु शकत नाही. असे प्रतिपादन पालघरचे खा.राजेंद्र गावीत यांनी केले.

शिवसेनेचा विचार सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि शिवसेना घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने राज्यात शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाटयमंदिरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, धुळे व नंदुरबारचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात,नंदुरबार सहसंपर्कप्रमुख संजय उकिरडे धुळयाचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, निरीक्षक अरविंद नाईक,

समाधान पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, जिल्हासमन्वयक दिपक गवते, सहसंपर्कप्रमुख अरूण चौधरी, जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, युवासेनेचे ललित जाट, युवती सेनेच्या मालती वळवी, तालुकाप्रमुख रविंद्र गिरासे, उपतालुकाप्रमुख कृष्णदासभाई पटेल, नंदुरबार शहर प्रमुख विजय माळी आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना खा.राजेंद्र गावीत म्हणाले की, नंदुरबार ही माझी जन्मभुमी आहे. त्यामुळे येथे काम करतांना विशेष आनंद मिळतो, राज्यपालांच्या अहंकारामुळे १२ जणांची आमदार रखडली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे तीन चाकाचे सरकार असले तरी पहिले चाक हे शिवसेनेचे आहे.

देशात सध्या महागाईने उंचाक गाठला असून श्रीलंके सारखी भारतात परिस्थिती निर्माण होत आहे. महागाईवरून नागरीकांचे ध्यान भंटकविण्यासाठी भोंगा, ज्ञानवापी, हनुमान चालीसा सारखे प्रकरणे बाहेर काढण्यात येत आहे. हिंदु मुस्लिम यांच्यात भांडणे लावून निवडणुक जिंकायचे भाजपाचे धोरण आहे.

यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून त्याचा एकदिवस स्फोटा होवून भाजपा नेस्तनाबुत होईल. असे खा.गावीत यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, सध्याच्या पंतप्रधानांनी एकही कंपनी निर्माण न करता अनेक कंपन्या विक्री केल्या आहेत.

केंद्र सरकारचा राज्य घटना बदलण्याचा प्रयत्न तो कधीही यशस्वी होणार नाही. केंद्र सरकार देशाचे वाटोळे करायला निघाले आहे. नंदुरबार जिल्ह्यशत शिवसैनिकांनी एकदिलाने शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करावेत.

शिवसेना पक्ष आदिवासी दुर्गम भागात काम करीत असून आदिवासी बांधवांना न्याय देत आहे. नंदुरबार जिल्ह्यात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना वगळून शिवसेना वाढु शकत नाही. असे प्रतिपादन खा.गावीत यांनी केले.

यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात म्हणाले की, म्हणाले आचार-विचार एकत्र आणण्यासाठी शिव संपर्क अभियान राबवण्यात येत असून शिवसैनिकांनी आत्मपरीक्षण करून काम करावे गावागावात जाऊन पक्षाचे कार्य बिंबवा जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी शिवसेना क्रमांक एकचा पक्ष करण्याचे आवाहन केले.

यावेळी नंदुरबार तालुकाप्रमुख नरेंद्र गिरासे यांनी प्रास्ताविक करून शिवसंपर्क अभियान राबवण्यात मागची भूमिका विषद केली. गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक तयार करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्ह्यातील तालुका प्रमुख, शहरप्रमुख विविध पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पेट्रोल-डिझेलची चोरटी विक्री केल्याने गुन्हा दाखल

Next Post

तर मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

Next Post
नंदूरबार जिल्ह्यात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना टाळून शिवसेना वाढविणे अशक्य : खा.राजेंद्र गावीत

तर मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add