धडगांव | प्रतिनिधी
पेरणी पूर्व माती परीक्षण व बीज उगवण क्षमता चाचणी करणे ही काळाची गरज असून, माती परीक्षण व बीज उगवण क्षमता चाचणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक भुजगाव येथे उमेद अभियानाच्या माध्यमातून स्वयं सहाय्यता गटातील सेंद्रिय शेती मधील सहभागी माहिलांना दाखविण्यात आले
खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग आला असून शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आगामी पेरणीसाठी खते, बियाणे खरेदीसाठी शेतकर्याची लगबग सुरू आहे. पेरणीनंतर बियाणे न उगवल्यास शेतकयांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. पेरणीपूर्व कोणती दक्षता घ्यावी यासाठी उमेद अभियान धडगांवअतर्गत उमेदचे तालुका व्यवस्तापक राहुल सोनवणे, प्रभाग समवन्वयक कृष्णा भोये यांनी कोरोनाचे नियम पाळून स्वयंसहाय्यता समूहातील माहिलांना सोयाबीन या पिकाची बियाणे बीज उगवण क्षमता बाबत प्रात्यक्षिक दाखविले.
व बीज उगवण चे महत्व फायदे काय आहे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. बियाण्याची उगवण शक्ती ७० टक्केच्या जवळपास वा त्यापेक्षा जास्त असल्यास घरचेच बियाणे पेरणी करण्याचे आवाहन केले. यावेळी उद्योगसखा विजय पावरा यांच्यासह सेंद्रिय शेती लोकल ग्रुप मधील सहभागी महिला उपस्थित होत्या.