Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या शेतशिवार रस्त्यांच्या कामासाठी ६० लाख मंजुर

team by team
June 23, 2021
in कृषी
0
शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या शेतशिवार रस्त्यांच्या कामासाठी ६० लाख मंजुर

तळोदा  | प्रतिनिधी

शहादा व तळोदा तालुक्यातील २० गावांमधील शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या पाणंद ( शेतशिवार ) रस्त्यांच्या कामासाठी आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या निधीतून ६० लाख रुपयांच्या निधी मंजूर केला असून यातून २० रस्ते घेण्यात आले आहेत.साहजिकच शेतकर्‍याच्या शेत रस्त्यांच्या प्रश्नी मार्गी लागणार आहे.आमदार निधीतून पाणंद रस्त्यांसाठी निधी खर्च करणारे जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असल्याचे म्हटले जात आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शहादा तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांनी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांशी त्यांच्या प्रश्नासाठी प्रत्यक्ष संवाद साधला तेव्हा अनेक गावांमधील शेतकर्‍यांनी शेत शिवराला जोडणार्‍या रस्त्यांच्या प्रश्न उपस्थित केला होता.रस्त्याअभावी शेतातील मालाची ने, आन करताना अत्यंत कसरत करावी लागत असते.शिवाय मशागतीस देखील अडचण येत असते.त्यामुळे हे रस्ते होणे गरजेचे असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. पाणंद योजना ही राज्याचा महसूल विभागाकडून राबवली जात असते.शिवाय तीस पुरेसा निधीही नसतो.साहजिकच स्थानिक महसूल प्रशासन मागणी आलेल्या कामांपैकी ठराविक कामांनाच प्राधान्य देत असते.त्यामुळे पुरेशा निधी अभावी ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची कामे प्रचंड असताना मार्गी लागलेले नसल्याची वस्तुस्थिती आहे.
तथापि आ. राजेश पाडवी यांनी शेतकर्‍यांच्या हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या फंडातून निधी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले.यासाठी त्यांनी साधारण ६० लाखांच्या निधी मंजूर केला आहे.यातून २० गावांमधील शेतकर्‍यांचे शेत शिवारातील २० रस्ते घेतली आहेत.यातून ६० किमीचे रस्ते तयार होणार आहेत.प्रत्येक तीन किमीच्या रस्त्यासाठी तीन लाखांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे.सदर कामांचे नियोजन देखील करण्यात आले असून लवकरच कामे सुरू करण्यात येणार आहेत. शहादा तळोदा तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पाणंद रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे परंतू  पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे युद्ग पातळीवर पूर्ण करावीत अशी अपेक्षा

बातमी शेअर करा
Previous Post

चिनोदा परिसरात पावसाचे आगमन,मात्र दमदार पावसाची प्रतिक्षाच

Next Post

भुजगाव येथे उमेद अभियानाअंतर्गत शेतीबाबत प्रात्यक्षीत

Next Post

भुजगाव येथे उमेद अभियानाअंतर्गत शेतीबाबत प्रात्यक्षीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add