शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए) मार्फ़त घेण्यात आलेल्या जी – पॅट २०२२ (ग्रॅज्युएट फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश संपादन केले.
दरवर्षी परीक्षा संपूर्ण देशातून बी. फार्मसी पदवीधारक किंवा पदवीच्या अंतिम वर्षांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच एम. फार्मसी पदवीत्तर उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेच्या स्वरूपात राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेतली जाते.
त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील ८ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यात महाविद्यालयातील विद्यार्थी कृतिका पाटील (९८.५५), विपुल इजापुरे (९६.५७), तेजस्वीनी गिरासे (९६.२५), प्रणव पाटील (९४.६१), जुबेर शेख (९४.६१), शुभम पाटील (९०.१९), सहारा पाडवी (६६.४३), शारीरिक दृष्ट्या अपंग श्रेणीत हेमकांत पटेल (६०) मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
जी – पॅट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली तर्फे पदव्युत्तर शिक्षणासाठी दरमहा १२ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते त्यासाठी महाविद्यालयातील आठ विद्यार्थी पात्र झाले आहेत.
जी – पॅट २०२२ परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपक भाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांना दिले.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, प्राचार्य डॉ आर.एस.पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल, प्राचार्य डॉ.एन.जे. पाटील, प्राचार्य बी.के.सोनी, प्राचार्य डॉ.व्ही.एस. पाटील यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, प्रा.डॉ.जवेश पाटील, प्रा.सैय्यद हमीद हसनी, प्रा.डॉ घनश्याम चव्हाण, प्रा.डॉ.हेमंत सूर्यवंशी, प्रा.डॉ.सौ.सुनिला पाटील, प्रा.संदीप तडवी, प्रा.सौ.सुलभा महाजन, प्रा.योगेश रोकडे, प्रा.अमित धनकानी, प्रा.सौ.अमृता पाटील, प्रा.आकाश जैन, प्रा.प्राची दुसाने, प्रा.सौ.मानसी धनकानी, प्रा.हितेंद्र चौधरी, प्रा.दिवाकर पाटील, प्रा. राजेश अहिरे, प्रा.आझम शेख, प्रा.समीर शेख, प्रा.रोशन चौधरी, प्रा.राहुल लोव्हारे, कार्यालयीन अधीक्षक डी.डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.