नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयात शिवसंपर्क अभियानाची सुरुवात होत असुन, नंदुरबार येथे दि.२९ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिर येथे सकाळी ११ वाजता शिवसंपर्क अभियानाचा निमित्ताने मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मेळाव्यात शिवसैनिकांना शिवसेनेचे खा.राजेंद्र गावीत व शिवसेनेचे नेते माजी आ. चंद्रकांत रघुवंशी हे मार्गदर्शन करणार असुन यावेळी नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास नंदुरबार शहरातील व तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, नगरसेवक विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी दि.२९ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिर, नंदुरबार येथे सकाळी ११ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, शिवसेनेचे नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र गिरासे, महानगरप्रमुख विजय माळी यांनी केले आहे.