नंदुरबार l प्रतिनिधी
खरीप हंगाम 2022-2023 साठी जिल्हास्तरावर निविष्ठा, बियाणे, खते व किटकनाशके या संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तक्रार निवारण नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या कक्षासाठी डी.एस.बाविस्कर यांची नियुक्ती केली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9623810798/9511208142/9373334681 असा आहे. तर ईमेल adozp@gmail. com/ dsaondb@gmail.com असा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि निविष्ठेबाबत तक्रार असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.