Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलच्या प्रवेशासाठी 5 जून रोजी पुर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

team by team
May 25, 2022
in शैक्षणिक
0
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलच्या प्रवेशासाठी 5 जून रोजी पुर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी‍ विकास प्रकल्प,तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलची प्रवेशपूर्व परीक्षा 5 जून 2022 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार असल्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

ही प्रवेश प्रक्रया सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षांकरिता इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेशासाठी व इयत्ता सातवी ते नववीच्या रिक्त जागांचा अनुशेष भरण्यासाठी घेण्यात येणार आहे. इयत्ता सहावीच्या वर्गात एकूण 60 विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येईल.

सदर प्रवेश पूर्व स्पर्धापरीक्षेचे 5 जून 2022 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत दोन परीक्षा (अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ) शासकीय आश्रमशाळा तालंबा, ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे तर ( धडगाव व तळोदा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ) शासकीय आश्रमशाळा सलसाडी ता.तळोदा जि.नंदुरबार या केंन्द्रावर होईल.

विद्यार्थ्यांची परीक्षा कोणत्या परीक्षा केंद्रावर होणार आहे याची माहिती प्रकल्प कार्यालयात लावण्यात आली आहे. परीक्षेस विद्यार्थ्यांनी सकाळी 9 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

विद्यार्थ्यांनी स्वत:चे आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात निळा पेन,पेपर पॅड, पाणी बॉटल इतकेच साहित्य आणता येईल.

मोबाईल, व डिजिटल घडयाळ्यास परीक्षा केंद्रात परवानगी नसेल. पर्यवेक्षकांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. कोणताही विद्यार्थी परीक्षा देतांना गैरप्रकार करतांना आढळल्यास विद्यार्थ्यांला परीक्षा देता येणार नाही.

सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी सदर परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या शाळेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिनांकास परिक्षा केंद्रावर सुरक्षितपणे घेवून जाण्याची व्यवस्था करावी.

तर जिल्हा परिषद व इतर शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळेतील परिक्षार्थी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर घेवून जाण्याची जबाबदारी संबंधित पालक, शिक्षकांची राहील.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी, नाशिक या संस्थेस राहील.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी सात भरारी पथक गठित

Next Post

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

Next Post
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add