तळोदा | प्रतिनिधी
इयत्ता १० वी सीबीएसई परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात तळोदा येथील तसेच पोतदार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार चा विद्यार्थी आयुष संजय परदेशी या विद्यार्थ्याने ९९.६ टक्के गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक तर देशात दुसरा क्रमांक पटकाविला असून त्याच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन करीत कौतुक केले जात असून तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाकडून शाल श्रीफळ देऊन त्याच्या सत्कार करण्यात आला व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आले.