नंदुरबार ! प्रतिनिधी
भालेर येथील का वि प्र संस्था संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्य. उच्च.माध्यमिक विद्यालयात विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रीमती क. पु. पाटील माध्य. उच्च.माध्यमिक विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर पाटील यांच्या व संग्राम ठाकरे यांच्या हस्ते जननायक बिरसा मुंडा,व तंट्या नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी काकर्दे येथील राकेश माळी ,कल्पेश ठाकरे व त्यांच्यासोबत सर्व आदिवासी बांधव कार्यक्रमास उपस्थित होते.



विद्यालयाच्या प्राचार्य सौ. विद्या चव्हाण यांनी विश्व आदिवासी दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन केले.व आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या.पर्यवेक्षक ए.व्ही.कुवर यांनी विश्व आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी संस्कृतीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक सी.के.पाटील, वाय.एन पाटील, एस.एस.पाटील पी.एस.सूर्यवंशी, ए.एस. पाटील, पी.डी.पाटील, एस.बी. पाटील व्ही.व्ही.इसी, सौ.बी.एल.पाटील सौ.सी.व्ही पाटील, सौ.व्ही.आर. पाटील, सौ.एस.पी.बागुल, दिनेश पाटील, निखिल पाटील, माधव पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्नम घेतले.