नवापूर ! प्रतिनिधी
विश्व आदिवासीदिनाचा पुर्व संध्येला नवापूर तालुक्यातील नागझरी गावात ज्या महिलांचे पती,नातेवाईक कोरोना महामारी मध्ये मृत्यृ झाले आहे अशा विधवा महिलांना युवा नेते धनंजय भरत गावीत व आयुब गावीत यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.
कोविड-१९ महामारीत देशात अनेक लोकांचा मृत्यृ झाला आहे.जवळचे नातेवाईक गेले. ही महामारी अजुन पण संपलेली नाही त्यामुळे सरकार नेहमी नागरीकांना कोविड-१९ ची लस घ्या,मास्क लावा,हात नेहमी धुतले पाहीजे,सोशल डिस्टन ठेवा असे सांगत असते.या कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांचे खूपच हाल होत आहे.त्यांच्याकडे मदतीचे आश्वासन आहे मात्र प्रत्यक्ष मदत दुरच आहे.अशात आजच्या युवकांमध्ये सेवाभाव मदतीचा हात प्रत्यक्ष कृतीतून आल्याचा अनुभव पाहायला मिळाला.सेवा अंगीभुत असल्याने देण्यासाठी हात नेहमी पुढे असल्याचे दिसले.त्याचे झाले असे की विश्व आदिवासी दिनाचा पुर्व संध्येला नवापूर तालुक्यातील नागझरी गावात ज्या महिलांचे पती,नातेवाईक कोरोना महामारी मध्ये मृत्यृ झाले आहे अशा विधवा महिलांना युवा नेते धनंजय भरत गावीत व आयुब गावीत यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.या विश्व आदिवासी दिनानिमित्त या युवकांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी ठरले.यावेळी प्रकाश गावीत,कनित गावीत,रवींद्र गावीत,लहू गावीत व गावकरी ग्रामस्थ उपस्थित होते.