शेकडो वर्षाची गणेशोत्सवाची परंपरा खंडित न करता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार सार्वजनिक गणेश मंडळांचा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केला. तसेच श्रीगणेशचे विसर्जनासाठी कृत्रिम हौद निर्माणस विरोध करु, असे एकमुखाने निश्चित केले.
हिंदु सेवा सहाय्य समितीने सार्वजनिक गणेश मंडळाचा बैठक तैलिक मंगल कार्यालय येथे आयोजित केली होती. व्यासपीठावर श्रीबाबा गणपती मंडळाचे सुनिल सोनार, जय बजरंग व्यायाम शाळेचे शेखर मराठे, मारुती व्यायाम शाळेचे अर्जुन मराठे, हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील उपस्थित होते.
शनिवार दि ७ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत नंदुरबार शहर आणि तालुक्यातील विविध मानाचे आणि अन्य गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणरायांच्या प्रतिमेचे पूजन करून व श्लोक पठन करून बैठकीचा प्रारंभ करण्यात आला. बैठकीत मंडळांना येणाऱ्या विविध अडचणी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मांडल्या, यात बंटी नेतलेकर,कैलास भावसार, मोहन अहिरे, मोहित राजपूत, छोटू माळी, शेखर मराठे, सुनील सोनार आदींनी गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनेवर चर्चा केली. मंडळांनी मांडलेल्या सर्व समस्यांवर शासन- प्रशासनाला मंगळवारी निवेदन देण्याचे एकमत झाले. हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील यांनी प्रस्तावनेतून गेल्या पाच वर्षात गणेश मंडळांना संघटित करून केलेल्या कार्याचा आढावा दिला. बैठकीचे सूत्रसंचालन राजू चौधरी यांनी तर आभार सुमित परदेशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयुर चौधरी, सुयोग सूर्यवंशी, जितेंद्र राजपूत, आकाश गावित, रणजित राजपूत, जितेंद्र मराठे, गणेश राजपूत, अमोल ठाकरे, उज्वल राजपूत आदींनी परिश्रम घेतले.