नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील एन.आय.आर.व्हीलाजवळ वाहनाने धडक दिल्याने पादचारी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील शांतीविहार येथील सुभाष पुनाजी पाटील हे एन.आय.आर.व्हीला जवळील रस्त्याने पायी जात होते. यावेळी राजेश डायाभाई ठक्कर (रा.जांगीराबाद, सुरत) याने त्याच्या ताब्यातील
वाहन (क्र.जी.जे. ०५ आरएच ९२००) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून पाठीमागून पायी जाणाऱ्या सुभाष पाटील यांना धडक दिल्याने त्यात ते जखमी झाले.
राजेश ठक्कर याने जखमी सुभाष पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल करुन उपचाराचा खर्च न देता पसार झाला.
याबाबत पोहेकॉ.अशोक कोळी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात भादंवि कलम २७९, ३३७ सह मोटार वाहन कायादा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अशोक कोळी करीत आहेत.