Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या

team by team
May 21, 2022
in सामाजिक
0
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या

म्हसावद l प्रतिनिधी
माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल देवराम ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच हत्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला दहा लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शहादा येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शहादा तहसीलदार यांच्यामार्फत गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.

या बाबत दिलेल्या निवेदनात असे लिहले आहे की यवतमाळ जिल्हा घाटंजी तालुक्यातील पारवा या गावातील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार यांची १५ मे २०२२ रोजी मध्यरात्री अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.

माहिती अधिकार अधिनियमानुसार माहिती मागीतली म्हणून सूड भावनेने सदर क्रूर हत्या झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासातून आणि प्रसार माध्यमातून समोर आले आहे.

सदर घटना ही धक्कादायक असून महाराष्ट्रांच्या प्रागतिक परंपरेला काळीमा फासणारी आहे. शासन व प्रशासन भ्रष्टाचार मुक्त, लोकाभिमुख व पारदर्शक चालावे म्हणून काम करणाऱ्या हजारो माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे जागरूक व संवदेनशील नागरिकांचे मनोधर्य खच्ची करणारी सदर घटना आहे.

सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र तर्फे मृत अनिल देवराव ओचावार यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषी आरोपीना सहा महिन्याच्या आत कठारातील कठोर शिक्षा मिळावी, या प्रकरणात व कटात सामील असू शकणारे व अपराध्याला चिथावणी देणारे सरकारी अधिकारी व सुत्रधार यांच्याही मुसक्या अवळाव्यात आणि त्यांना आरोपी करून कसून चौकशी करावी,

माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून जीव धोक्यात घालून काम करून प्रशासन व शासन पारदर्शक
चालावे म्हणून आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या मृत कार्यकर्ता अनिल देवराव ओचावार यांच्या
कुटुंबियांना किमान दहा लाख रूपयांची आर्थिक मदत सरकारने जाहिर करावी.

माहिती अधिकार कार्यकर्त्यांना धमक्या देणे, हल्ले करणे, मारहाण होणे व त्यांच्या हत्या होणे
अशा घटनांमध्ये वरचेवर बाढ होत आहे. ही गंभीर बाब आहे. माहिती अधिकार कार्यकत्यांची सुरक्षा
व सरक्षण या सबंधी शासनाने धोरणात्मक उपाययोजना अंमलात आणणे आवश्यक आहे. शासनानेया संबंधी कडक उपाय योजना कराव्यात,

माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आवश्यक तेथे तातडीने पोलीस संरक्षण मिळणे अत्यावशक
आहे. अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनावर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे शहादा तालुका कार्याध्यक्ष राजू शिंदे ,रा.का.सदस्य शरद मराठे,प्रसिद्धी प्रमुख घनश्याम सोनवणे व मनोज बिरारी,कॉ. सुनील गायकवाड,दीपक ठाकरे आदींच्या सह्या आहेत.

 

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबारात मशरूम शेती औद्योगिक ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन

Next Post

वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा

Next Post
चढावावर महिंद्रामॅक्स गाडी उलटल्याने सहा जण जखमी

वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add