नंदुरबार ! प्रतिनिधी
कोकणच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नंदुरबार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते नारळ वाहून जीवनावश्यक वस्तूंचा एक टेम्पो कोकणातील चिपळूण येथे रवाना करण्यात आला आहे.
महापुराच्या प्रलयकारी घटनेने कोकण मधील चिपळूण भागाला मोठा फटका बसला आहे. अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाअध्यक्ष विजय चौधरी यांनी पुढाकार घेतला. पूरग्रस्तांसाठी विविध दात्यांकडून आपल्या कार्यकर्त्यामार्फत जीवनावश्यक वस्तूंचा साठा गोळा केला. रविवारी या वस्तूंनी भरलेला एक टेम्पो चिपळूणसाठी मान्यवरांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जयप्रकाश बावीस्कार, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, तालुकाध्यक्ष राकेश माळी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोकणी, मनविसे जिल्हाअध्यक्ष प्रविण जोशी, नवापुर शहराध्यक्ष रफिक शेख, तालुकाध्यक्ष संदीप गावीत, दिनेश मराठे, ऋषिकेश चौधरी, डॉ. चंद्रकांत जोशी, रविंद्र माळी, राकेश गामीत, शेख जुबेर, सोहेल पठाण, अक्षय मोहीते, वदेश वसावे, संजय गावीत, रवि मावची आदी पदाधिकारी उपस्थित होते.