नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली या गावात महाराष्ट्राचा मतदार नंबर 1 राहतो. 2019 च्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत मणिबेली येथील वरसन बिज्या वसावे हा होता.
हे गांव सरदार सरोवर प्रकल्पात बुडितात जाणारं पहिलं गांव या गावातील बिज्या दामजा वसावे यांचे घर व खात्याची जमीन धरणाची उंची 90 मीटर च्या खाली असताना बुडितात गेली .
नर्मदा ट्रिब्युनल अवोर्ड नुसार जर ह्या पावसाळ्यात घर बुडितात जात असेल तर त्या बाधिताचे पुनर्वसन एक वर्षाआधी झाले पाहिजे.मणिबेली च्या बहुतांश घरे व जमिनी 1994/95 मध्येच बुडितात आल्या.
परंतु अजूनही शासनाने मणिबेली च्या बाधितांचे पुनर्वसन पूर्ण केलेले नाही.यापैकी बऱ्याच बाधितांना 5/6वर्षांपूर्वी काथर्डे दिगर वसाहतीत जमिनी दिल्या परंतु घरप्लॉट साठी जागा शिल्लक नसल्याने ही कुटुंब मुळगावातच राहून पुनर्वसन ची जमीन कसत आहेत,
गेल्यावर्षी जातर मगन वसावे व बिज्या दामजा वसावे (दोन्ही रा. मणिबेली) यांची मुळगावातच प्राणज्योत विझली. देशाच्या विकासासाठी घर -जमीन देऊन त्याग केला परंतु जीवंत असे पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी पुनर्वसन मध्ये घर जमीन देऊन पुनर्वसन करू शकले नाहीत.
बिज्या दामजा यांचा मुलगा वरसन बिज्या हा महाराष्ट्राचा 2019चा मतदार नंबर 1 .याची त्यावेळेस मीडियाने गावात जाऊन मुलाखत घेतली.इंडियन एक्स्प्रेस ला मोठी बातमी आली.
परंतु ही व्यक्ती अजूनही घरप्लॉट शिवाय मुळगावातच. अजून किती वर्षे इथेच राहून जमीन कसायची म्हणून वडिलांचे घर वसाहतीत शिफ्टिंग केले.तर आता घर उभारण्यासाठी जागा नाही.
वेळोवेळी प्रकल्प बाधितांनी उरलेल्या46 प्रकल्पबाधितांच्या घरप्लॉट साठी जागा खरेदी करून गावठाण निर्माण करा, सर्व नागरी सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या अशी मागणी केली.
गेल्या वेळी मेधाताईंच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या सोबत मीटिंग झाली ,मीटिंग च्या इतिवृत्तामध्ये जिल्हाधिकारी मॅडमांनी कालावधी निश्चित केला.दिलेला कालावधी कधीच संपला परंतु अद्याप कार्यवाही संबंधित विभागाने पूर्ण केली नाही.
त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.4 .36 हेक्टर जमीन लागणार आहे . गावठाणच्या बाजूला शेतकरी जमीन द्यायला तयार आहे.परंतु फाईल कुठं नेमकी अडली आहे ,माहीत नाही.पावसाळा तोंडावर आला आहे ,
ससप्र च्या संथगतीने चालणाऱ्या कामामुळे याही वर्षी मुळगावातूनच जमीन बाधितांना कसावी लागते की काय म्हणून आता बाधितांचा संयम आता संपला आहे. ससप्र लवकर म्हणजे ह्या पावसाळयापूर्वी हा प्रश्न सोडवला नाहीतर, मेन रस्त्यावर उतरून घरे बांधून आंदोलन करू अशा निश्चयावर येत आहेत. रस्त्यावर पहिलं घर पहिल्या मतदाराचे असेल.