म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील पोलीस स्टेशनला अभिनेत्री केतकी चितळे विरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीतर्फे देण्यात आले.
अभिनेत्री केतकी चितळे हिने नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याविषयी अतिशय आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल केली आहे.सदर ही पोस्ट अतिशय अपमानजनक आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसाठी संतापजनक ठरली आहे. अनुषंगाने सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन केतकी चितळे हिचावर तातडीने कठोर कायदेशीर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी,असे निवेदन पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका उपाध्यक्ष ॲड.सतीश पाटील व जिल्हा चिटणीस सौ.मंजुळाताई पाडवी यांनी दिले यावेळी यावेळी प्रमिला ठाकरे,मनिषा बेडसे,राजेंद्र ठाकरे आदी महिला पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.