धुळे l प्रतिनिधी-
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात काल रात्री भीषण अपघात झाला. त्यात तीन जण जागीच ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत. मृत व जखमी है तरडी (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील रहिवासी आहेत.
पुरमेपाडा शिवारात काल रात्री ट्रक, रिक्षा आणि क्रुझर या तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. रात्री 11.30 वाजेच्या दरम्यान अपघात झाला. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी रिक्षा चालक बराच वेळ ट्रकखाली तसाच अडकून होता. रात्री उशिरापर्यंत अडकलेल्या रिक्षा
चालकाला क्रेनच्या सहाय्याने काढण्याचे पोलीस प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. तर
जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.