नंदुरबार | प्रतिनिधी
नंदूरबार येथील एस.ए.मिशन हायस्कुलच्या प्राचार्या नुतनवर्षा राजेश वळवी यांची नंदुरबार जिल्हा भारत स्काऊट गाईड संस्थेच्या सहाय्यक जिल्हा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबार शहरातील एस.ए.मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य नुतनवर्षा राजेश वळवी यांच्या कार्याची शानस्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार भारत स्काऊटस आणि गाईडस राज्य कार्यालय मुंबई संस्थेचे राज्य मुख्य आयुक्त तथा क्रीडा व युवक सेवा संचालनालय क्रीडायुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नंदुरबार भारत स्काऊट आणि गाईडस् जिल्हा संस्थेवर सहाय्यक जिल्हा आयुक्तपदी प्राचार्य नुतनवर्षा वळवी यांची नियुक्ती केली आहे. त्या नियुक्तीबद्दल त्यांचे संस्थेचे डॉ.राजेश वळवी, चेअरमन जे.एच.पठारे, उपमुख्याध्यापक पवार, पर्यवेक्षक मिनल वळवी आदींनी अभिनंदन केले.