Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुड्यातील भगतसिंग वळवी याने टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये ५० किलोमीटर गटात मिळविला प्रथम क्रमांक

team by team
May 15, 2022
in राज्य
0
सातपुड्यातील भगतसिंग वळवी याने टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये ५० किलोमीटर गटात मिळविला प्रथम क्रमांक

नंदुरबार l प्रतिनिधी
लोणावळा येथे झालेल्या टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सातपुड्यातील भगतसिंग रामसिंग वळवी यांने ५० किलोमीटर गटात प्रथम क्रमांक पटकावला पटकाविला.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील असली गावचा रहिवासी भगतसिंग रामसिंग वळवी याने लोणावळा पुणे येथे झालेल्या टाटा अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत ५० किलोमीटर गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. रात्री 1 वाजता सुरू झालेल्या या टाटा अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये ५० किलोमीटर अंतर तीन तास 18 मिनिट वेळेत आपली दौड पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आयपीएस कृष्ण प्रकाश यांनी भगतसिंग वळवी यांना सन्मानचिन्ह व ७५ हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरव करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भगतसिंग सोबत धडगाव तालुक्यातील आणखी दोन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. 35 किलोमीटर गटात उदेसिंग पाडवी यांनी दोन तास ते 30 मिनिटात आपली दौड पूर्ण करून द्वितीय उपविजेतेपद पटकावले आहे. त्यांना दहा हजार रुपये रोख पारितोषिक बक्षीस देण्यात आले आहे. तर धडगाव तालुक्‍यातील दारासिंग पावरा या विद्यार्थ्यांने 35 किलोमीटर गटाचे अंतर तीन तास तीन मिनिटात पूर्ण करत सातव्या स्थानावर समाधानकारक कामगिरी बजावली आहे. सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त असलेल्या टाटा अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवून विजेतेपद पटकावून सातपुडाचे नाव उंचावले आहे. या विद्यार्थ्यांना साक्री तालुक्यातील अंकेश कुवर विप्रो कंपनी मुंबई. मनोज गावित राहणार चितवी, नवी मुंबई पोलिस यांनी मोलाचे मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य केले आहे. भगतसिंग वळवी यांनी याआधी अहमदाबाद, बडोदा, मुंबई, लोणावळा, पुणे या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धामध्ये सहभाग घेऊन एक उत्कृष्ट धावपटू म्हणून कामगिरी बजावली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी

Next Post

मिशनच्या प्राचार्या नुतनवर्षा वळवी यांची स्काऊट गाईडच्या सहाय्यक जिल्हा आयुक्तपदी नियुक्ती

Next Post
मिशनच्या प्राचार्या नुतनवर्षा वळवी यांची स्काऊट गाईडच्या सहाय्यक जिल्हा आयुक्तपदी नियुक्ती

मिशनच्या प्राचार्या नुतनवर्षा वळवी यांची स्काऊट गाईडच्या सहाय्यक जिल्हा आयुक्तपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add