नवापूर l प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील हतगड येथे आजादी का अमृत महोस्तव निमित्त नाशिक भाजपाच्या वतीने केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ना.अर्जुन मुंडा व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा आणि आदिवासी शेतकरी, शेतमजूर, आदिवासी आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास नवापुर तालुक्याचे भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह या मेळाव्याला उपस्थित होते प्रसंगी भरत गावीत यांनी केंद्रीय मंत्री .ना.अर्जुन मुंडा व डॉ.भारतीताई पवार यांची मंचावर जाऊन भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्र गावित, भाजपा अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी , कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.नवापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.