नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील बलवंड शिवारात असलेल्या सुजलॉन कंपनीच्या टॉववरुन १ लाख रुपये किंमतीची तांब्याची पॉवर केबल चोरी केल्याप्रकरणी पाच संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bयाबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तालुक्यातील बलवंड शिवारात सुजलॉन कंपनीचे टॉवर क्र.के. ११ आहे. सदर टॉवरवरुन अज्ञातांनी ६० हजार रुपये किंमतीची ३०० मीटर तांब्याची पॉवर व ४० हजार रुपये किंमतीची २२४ मीटर पॉवर केबल अशी एकूण १ लाख रुपये किंमतीची पॉवर केबल चोरुन नेली. याबाबत सुपरवायझर दवा भावराव पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात संशयित देविदास भाईदास भील, हिरामण दिलीप भील, रविंद्र लाल भील, आनंदसिंग सदू भील व सईद मुसा खाटीक या पाच जणांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.