तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील तळवे येथे सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने विविधकार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध करण्यात आली होती त्याचअनुषंगाने
विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक घेण्यात आली. आणि या बैठकीमध्ये चेअरमन पदी पुनमचंद ओंकार वळवी तर व्हा.चेअरमन पदी विनायक अशोक पाटील यांच्या नावाला सर्व संचालक मंडळाने सहमती दर्शविल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संचालक शांतीलाल पांडू गायकवाड, रतीलाल छगन पाटील, विजय मुरार पाटील, तुकाराम फकीर मराठे, मंगेश भिका मराठे, राजेंद्र रमण मोगल, विमलबाई वेडु मोगल, विजय गोरख नाईक यांची ही बिनविरोध निवड झाली असून नूतन पदाधिकारीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.