नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील नांदरखेडा ते भिलाई फाट्याजवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने वडील व मुलाला दुखापत झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील नवा कुंभारवाडा येथील सचिन महारु कुंभार व त्यांचे वडील महारु तुकाराम कुंभार हे दुचाकीने (क्र.एम.एच.३९ एके ६७११) नांदरखेडा ते भिलाई रस्त्याने नंदुरबारकडे येत होते. यावेळी एका दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एस ३३८३) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष भरधाव वेगात समोरुन दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात सचिन कुंभार व महारु कुंभार यांना दुखापत झाली. तसेच दुचाकींचेही नुकसान झाले. अपघातानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत सचिन कुंभार यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम २७९, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुरेश वसावे करीत आहेत.








