Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विजेचा धक्का लागल्याने नवरदेवाच्या जीवलग मित्राचा मृत्यू

team by team
May 12, 2022
in क्राईम
0
विजेचा धक्का लागल्याने नवरदेवाच्या जीवलग मित्राचा मृत्यू

शहादा । प्रतिनिधी
धुमधडाक्‍यात विवाह झाल्‍यानंतर 24 तास होत नाही तोच नवरदेवाचा जिवलग मित्र याला विजेचा धक्का लागल्याने निधन झाल्याची दुःखद घटना लोणखेडा येथे घडली असून लग्न घरात व मयत मुलाच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सविस्तर वृत्त असे की, लोणखेडा येथे आपल्या जीवलग मित्राचे लग्न दि. 9 रोजी पार पाडले. दुसऱ्या दिवशी गुळण्या टाकण्याचा कार्यक्रम चालू असताना चि.गणेश गिरासे (वय 24) रा. दोंदवाडा (मध्यप्रदेश) हल्ली मुक्काम लोणखेडा,ता. शहादा याला मंडपाच्या लोखंडी पाईपचा विजेचा धक्का लागला. गुळण्या टाकण्याचा कार्यक्रम असल्याने गणेशचे अंग व कपडे पाण्याने भिजले होते. विजेचा धक्का एवढा जबरदस्त होता की त्याला सोडायला गेलेले तीन ते चार व्यक्तीही फेकले गेले.विजेचा धक्का लागल्याने गणेश जागीच बेशुद्ध झाल्याने त्यास खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासणी नंतर त्याला मृत घोषित केले. सदर घटना नातेवाईक व परिसरात पसरताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश हा आपल्या उदरनिर्वाहासाठी लोणखेडा येथे सुप्रिया ऑटो गॅरेज चालवून दुचाकी दुरुस्तीचे काम करत होता. अत्यंत हसतमुख व मनमिळावू स्वभावाचा असल्याने मित्रपरिवार व परिसरात घटनेबद्दल दुःख व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गणेश हा घरात एकुलता एक मुलगा होता आई वडिलांची जबाबदारी त्यावरच होती. या घटनेने सदर गिरासे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

Next Post

दुचाकींची समोरासमोर धडक, वडील व मुलाला दुखापत

Next Post
कारची दुचाकीला धडक ; पती-पत्नी जखमी

दुचाकींची समोरासमोर धडक, वडील व मुलाला दुखापत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add