नवापूर l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील नांदवन गाव शिवारातील बामन जिन्या गावीत यांच्या शेताला लागून असलेल्या खोल उतारावरील नाल्यात शेती नांगरणी करीत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे.याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की नांदवन गावातील रणजित हिरालाल गावीत (वय 37) हा इसम नांदवन गाव शिवारा लगत असलेल्या बामन जिन्या गावित यांच्या शेताला लागून असलेल्या शेतात ट्रॅक्टर (क्र. एम. एच. 39, ए .एफ. 3450) ने नांगरणी करीत होता. शेताजवळ असलेल्या खोल उतारावर नाल्यात ट्रॅक्टर वळण करीत असताना नाल्या कडील भागात दुर्लक्ष झाल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. या अपघातात ट्रॅक्टर चालक रणजित हिरालाल गावित हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात वामन जीन्या गावित यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.