म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील कर्मासाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलाचा संचालिका तथा सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिव सौ.वर्षा संजय जाधव यांची नुकतीच स्काऊट गाईडचा जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी त्यांचा कार्यकुशलतेची शासनस्तरावर दखल घेत गौरवार्थ ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा प्रेरणादायी नियुक्तीबद्दल शैक्षणिक परिवारातील पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर मित्र परिवार नातेवाईक आप्तेष्ट यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे . या निवडीने शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सौ.वर्षा जाधव यांच्या समाजातील प्रत्येक घटकाशी असलेला ऋणानुबंध त्यांच्यासाठी दातृत्वाचा हात सदैव पुढे ठेवत त्यांना मदत करण्याची वृत्ती तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सर्वांगीण उन्नतीसाठी सतत उपक्रम राबविण्याची क्रियाशीलता आदी बाबी विचारात घेता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड राज्य कार्यालय मुंबई या संस्थेच्या राज्य मुख्य आयुक्त तथा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन ओमप्रकाश बकोरिया यांनी सौ.वर्षा जाधव यांची गाइडच्या जिल्हा मुख्यालय आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे.जिल्हा कार्यालयात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये कब बुलबुल स्काऊट गाईड रेंज रोवर रेंज या पथकाचे कार्य तसेच जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये प्रत्येक शाळेतील स्काऊट गाईड सहभागी होण्यासाठी ही समिती कार्यशील राहील. या निवडीबद्दल सोनाबाई शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई जाधव, सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुधीर जाधव ,सचिव प्रा. संजय जाधव, विश्वस्त इस्माईल मंसुरी, समन्वयक संजय राजपूत आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.