Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गौसेवा आणि वृक्ष लागवड विश्वातील सर्वात मोठी सेवा : ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी

team by team
May 11, 2022
in सामाजिक
0
गौसेवा आणि वृक्ष लागवड विश्वातील सर्वात मोठी सेवा : ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी

नंदुरबार l प्रतिनिधी
गौसेवा आणि वृक्षलागवड ही जगातील सर्वात मोठी सेवा आहे. म्हणून प्रत्येक मानवाने गौसेवा आणि वृक्ष लागवड हा संकल्प काळाची नव्हे तर वर्तमानाची गरज आहे. या दोन्ही सेवेतून पुण्यकर्म प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी चौपाळेकर यांनी केले.दरम्यान आज बुधवारी कथेची सांगता होईल.
शहरातील कोरीट रस्त्यावरील ओमशांती नगर परिसरात सुरु असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेत मंगळवारी रूक्मिणी स्वयंवर देखावा लक्षवेधी ठरला. पश्चिम रेल्वेतील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत ओंकार खैरनार यांच्या सेवापुर्ती निमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. या संगीतमय कथेचे निरुपण रकसवाडे येथील कथा प्रवक्ता भागवताचार्य ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी चौपाळेकर करीत आहेत. ते पुढे म्हणाले की, नेहमी भौतिक सुखाकडे धावणार्‍या मानवाने निसर्गाकडे दुर्लक्ष केल्याने 44 अंशांपर्यंत तापमान पोहोचले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गौसेवा आणि वृक्षलागवड करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राकसवाडे येथील गौ, गीता, गोपी, वृक्ष सेवा समितीच्या माध्यमातून गाईंची सेवा, गीता वाटप व शिक्षण, वृक्ष लागवड, वृक्ष दान सेवाकार्य होत असून या पुण्य कार्यास दानशूर दात्यांनी सढळ हस्ते योगदान देण्याचे आवाहन ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी चौपाळेकर यांनी केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल जवळील ओमशांती नगरातील प्लॉट क्रमांक 53 येथे श्रीमद् भागवत कथेचीआज दुपारी सांगता असून आज बुधवार दिनांक 11 मे रोजी दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे वितरण होईल. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक वसंत खैरनार, रत्नप्रभा खैरनार, छायाचित्रकार नंदू खैरनार आणि परिवारातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन नाही, मात्र ८ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन

Next Post

शिवसेनेच्या मागणीमुळे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचयातींचे विभाजन : शिवेसना नेते मा.आ.चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add