Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन नाही, मात्र ८ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन

Mahesh Patil by Mahesh Patil
May 11, 2022
in राज्य
0
महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन नाही, मात्र ८ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन

नंदूरबार l प्रतिनिधी
कोळसा टंचाईचे संकट व उन्हाच्या तडाख्यामुळे विजेची वाढती मागणी कायम असताना महावितरणने गेल्या १९ दिवसांपासून राज्यात कोणत्याही वाहिनीवर विजेचे भारनियमन केले नाही. भारनियमन टाळण्यासाठी तासागणिक सुरू असलेल्या यशस्वी नियोजनाद्वारे ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्याचा सुखद दिलासा दिला आहे. याऊलट देशात उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आदींसह आठ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन सुरु असल्याची स्थिती कायम आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि. १०) दुपारच्या सुमारास राज्यात एकूण २६ हजार ७०० मेगावॅट विजेची मागणी होती. यामध्ये मुंबई वगळता उर्वरित राज्यामधील महावितरणच्या कार्यक्षेत्रात २३ हजार ४०० मेगावॅट विजेची मागणी होती. त्यानुसार महावितरणने सुरळीत वीजपुरवठा केला आहे. तसेच गेल्या दि. २१ एप्रिलपासून राज्यात कोणत्याही भागातील वीजवाहिनीवर भारनियमन करण्यात आलेले नाही. सोबतच कृषिपंपांना देखील वेळापत्रकानुसार चक्राकार पद्धतीने दिवसा व रात्री ८ तास वीजपुरवठा सुरळीत आहे.
गेल्या मार्चपासून उन्हाच्या वाढत्या तडाख्यांमुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचवेळी कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे विजेचे देशव्यापी निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात एप्रिलमध्ये विजेची मागणी २४५०० मेगावॅटवर गेल्यामुळे व त्यातुलनेत वीज उपलब्ध होत नसल्याने ८ ते १० दिवसांमध्ये विजेच्या भारनियमनाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री ना. श्री. प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) श्री.दिनेश वाघमारे यांच्या पाठपुरावा व सकारात्मक पाठबळामुळे तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे गेल्या दि. २१ एप्रिलपासून राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यात महावितरणला यश आले आहे. विजेच्या मागणीचे विक्रमी उच्चांक होत असताना देखील भारनियमन करण्यात आले नाही हे विशेष.
महावितरणकडून सूक्ष्म नियोजन करून विजेची मागणी आणि त्या तुलनेत विविध स्त्रोत व वीज निर्मिती कंपन्यांकडून किती प्रमाणात वीज उपलब्ध होत आहे यावर तासागणिक बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. मागणीनुसार पुरेशी वीज उपलब्ध करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याची फलश्रृती म्हणून एकीकडे देशातील १५ राज्यांमध्ये विजेचे भारनियमन सुरु असताना मात्र महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन करण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत वीजसंकटामुळे भारनियमनाला सामोरे जाणाऱ्या राज्यांची संख्या १५ वरून ८ वर आली आहे. यामध्ये मंगळवारी (दि. १०) देखील उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू काश्मीर व लडाख, झारखंड, मेघालय या राज्यांमध्ये विजेच्या भारनियमनाची स्थिती कायम होती.
महावितरणच्या कार्यक्षेत्रात मंगळवारी दुपारच्या सुमारास २३ हजार ४०० मेगावॅट विजेची मागणी होती. त्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून ७३०० मेगावॅट, गॅस प्रकल्प- २५०, अदानी- २३८८, रतन इंडिया- १२००, सीजीपीएल- ५६३, केंद्राकडून- ५६३०, सौर, पवन व इतर स्त्रोतांच्या नवीन व नवीकरणीय प्रकल्पांकडून ५०४५ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. तर उर्वरित विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्प आणि आवश्यकतेनुसार खुल्या बाजारात वीज खरेदी करून राज्यात विजेच्या मागणीनुसार सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करण्यात आला.
महावितरणच्या यशस्वी प्रयत्नांमुळे राज्यात सध्या विजेचे भारनियमन बंद आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याचे वीज संकट पूर्णतः दूर होईपर्यंत यापुढेही भारनियमन टाळण्याचे महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नटावद आदिवासी वि.का.सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश गावीत तर व्हा.चेअरमनपदी रणजीत नाईक

Next Post

गौसेवा आणि वृक्ष लागवड विश्वातील सर्वात मोठी सेवा : ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी

Next Post
गौसेवा आणि वृक्ष लागवड विश्वातील सर्वात मोठी सेवा : ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी

गौसेवा आणि वृक्ष लागवड विश्वातील सर्वात मोठी सेवा : ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

October 17, 2025
वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

October 17, 2025
गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

October 17, 2025
एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group