खापर l प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत खापर येथील सुपुत्र, जितेंद्र हरिभाऊ प्रजापति हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्याबद्दल त्यांच्या व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ पंच मंडळाचे चेअरमन कांतीलाल प्रजापती व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नुकताच पार पडला..
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंत गोरोबाकाका कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सदस्य जगन्नाथ सोमा कुंभार, पंच मंडळाचे अध्यक्ष कांतीलाल प्रजापती, जिल्हा संघटनेचे सल्लागार व कोषाध्यक्ष इंजिनियर रमणलाल प्रजापति, जिल्हाध्यक्ष हृदयेश चव्हाण, पंच मंडळाचे सचिव रोहिदास कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष छोटूलाल प्रजापती, आनंदा कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजाने केलेला माझा सत्कार, तसेच माझ्या आई वडिलांचा सत्कार.. हा क्षण मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. तसेच समाजाच्या कुठलाही सामाजिक कार्यास माझा नेहमीच हातभार असेल, असे प्रतिपादन सत्कारमूर्ती जितेंद्र प्रजापति यांनी केले. कार्यक्रमास हरी प्रजापती, शांतीलाल प्रजापती, प्रवीण कुंभार, पुरुषोत्तम कुंभार, अरुण कुंभार, छोटू कुंभार, मनोज कुंभार ,परेश प्रजापती आधी समाज, बांधव व युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास कुंभार यांनी केले. आभार प्रदर्शन रमणलाल प्रजापती यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.