Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बेघरांच्या निवार्‍यासाठी ९९ लाख मंजूर,सभेत २३ विषयांना बहुमताने मंजुरी

team by team
August 6, 2021
in Uncategorized
0
नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बेघरांच्या निवार्‍यासाठी ९९ लाख मंजूर,सभेत २३ विषयांना बहुमताने मंजुरी

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालिकेने शहरातील बेघरांना मोठा दिलासा दिला असुन दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत बेघरांना निवारा बांधकाम करण्यासाठी ९८ लाख ७५ हजार २१४ रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह सर्वसाधारण सभेत २३ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात देण्यासह लिलाव प्रक्रियेत चुकीची माहिती देणार्‍या अभियंत्यासह लिपिकावर कारवाईचा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला.
नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज शुक्रवार दि.६ रोजी नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला कळंबू येथील भारतीय सैन्यदलातील जवान, विदर्भात आलेल्या महापुरात वाहून गेलेल्या मयत यांच्यासह दुःखद निधन झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेच्या अजेंड्यावरील २३ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.
पालिकेच्या एप्रिल ते जून अखेर जमा आणि खर्चाचा तिमाही हिशोब आला मंजुरी मिळाली. आर्थिक वर्षात नवीन मालमत्तांचे पुरवणी आकारणी करणे. हरित क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत दोन खुल्या जागा विकसित करण्याकरिता सुधारित प्रस्तावास मंजुरी देणे. शहरातील विविध रस्त्यांवर मशीनद्वारे मार्किंग करून पांढरे पट्टे रंगविण्याच्या संभाव्य खर्चास मंजुरी देणे. नेहरू नगरातील खुल्या जागेत सामाजिक सभागृहाच्या बांधकामास मंजुरी देणे. गौतम नगरमध्ये रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे व इतर पाच कामांचे अंदाजपत्रक मंजूर करणे. नगरपरिषद हद्दीत शाळा सुरू करण्यासाठी नाममात्र भाडेतत्वावर इमारतमिळण्यासाठी नॅशनल एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड या संस्थेने केलेल्या विनंती अर्जावर विचारविनिमय करणे. झराळीतील ११.० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्याच्या कामास सभेत मंजुरी देण्यात आली.
दरम्यान भंगार साहित्य लिलावात विद्युत विभागाचे अभियंता व लिपिकाने भंगार पोल विक्री बाबत नगरपरिषदेला चुकीची माहिती दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव आज शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. तालुका क्रीडा संकुलाची जागेचा विकास करण्यासाठी पालिकेकडे हस्तांतरण करणे बाबत शासन निर्णयाच्या विचारविनिमय करणे. सार्वजनिक शौचालयांची देखभाल व दुरुस्तीचा ठेका रद्द करून नव्याने ठेका देण्याचा निर्णय सभेत बहुमताने झाला.यासह कोरोना बाधित मृतांवर अंत्यविधी करण्यासाठी मानधन तत्वावर दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे. नगरसेवकांनी सुचविल्या नुसार कृष्णा नगर मध्ये मंजूर झालेली कामांऐवजी श्रीकृष्ण नगरमध्ये करण्यास मंजुरी देण्यात आली. सभेत उपनगराध्यक्ष रवींद्र पवार,मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती व नगरसेवकांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

Next Post

सुंदर्दे येथे धाडसी घरफोडीत पाच लाखांचा मुद्देमाल लंपास, वाढत्या घरफोडी मुळे नागरिक भयभित

Next Post
सुंदर्दे येथे धाडसी घरफोडीत पाच लाखांचा मुद्देमाल लंपास, वाढत्या घरफोडी मुळे नागरिक भयभित

सुंदर्दे येथे धाडसी घरफोडीत पाच लाखांचा मुद्देमाल लंपास, वाढत्या घरफोडी मुळे नागरिक भयभित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add