नंदुरबार | प्रतिनिधी
सोमवारी ४४.९ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाच्या पार्याची नोंद करण्यात आल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान काल रविवारी सरासरी ४४.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाच्या पार्याची नोंद करण्यात आली होती.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला आहे.दरम्यान यंदा मार्चपासूनच तापमानाचा पारा चाळीशी पार झाला आहे. दि. २८ रोजी तब्बल ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.त्यानंतर तापमान घसरत ४० अंश सेल्सिअस पर्यंत घसरले मात्र तीन दिवसांपासून तापमानात वाढ झालेली दिसून आली असून काल दि.९ मे रविवार रोजी ४४.९ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आल्याचे कोळदा कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी सांगितले.दरम्यान दि.८ मे रोजी ४४.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती.वाढत्या उष्णतेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य चौक आणि रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.आणखी काही दिवस तापमान कायम राहणार असून अजून तापमान अजून वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी हवामान केंद्रातर्फे सांगण्यात आले. शेतकर्यांनी स्वतःची व पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.