Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पत्रकाराची मोटर सायकल चोरट्यास मध्य प्रदेश राज्यात स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

team by team
May 9, 2022
in क्राईम
0
वडाळी – काकर्दा रस्त्यावर अनोळखी इसमाच्या मृत्यू ; सारंगखेडा पोलिसांचे ओळख पटविण्याचे आव्हान

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथून पत्रकाराची दुचाकी लंपास करणाऱ्या
चोरट्यास मध्य प्रदेश राज्यात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 9 ते 10 एप्रिल दरम्यान नितीन अरुण पाटील व्यवसाय पत्रकार रा . वृंदावन कॉलनी , नंदुरबार यांच्या मालकीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटर सायकल (क्र.एम.एच.39,आर.6564 ) ही त्यांच्या राहत्या घराच्या अंगणातून कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता . स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असतांना दि
6 मे 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , सदर गुन्ह्यातील मोटर सायकल मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील सनावद येथील सुलतान शेख व त्याचा साथीदार सुरत ठाकुर अशांनी मिळून चोरी केलेली आहे . त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ तयार करुन त्यांना सनावद जि . खरगोन येथे रवाना केले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने सुलतान शेख व त्याचा साथीदार सुरज ठाकुर यांचा शोध घेतला असता दि.7 मे रोजी सनावद गावातील मुख्य बाजार पेठेतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुलतान रशिदशाह दिवान रा . इनपुन गोगावा रोड , सनावद ता सनावद जि . खरगोन मध्य प्रदेश यास अटक करून त्यास गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने सदरची मोटर सायकल ही खरगोन जिल्ह्यातील मेनगांव येथे नादुरुस्त झाल्याने मोटर सायकल तिथेच सोडून दिल्याचे सांगितल्याने मेनगांव जि . खरगोन पोलीसांची संपर्क करुन त्यांना सदर बाबत माहिती देवून मोटर सायकल ताब्यात घेण्यास सांगितले आहे . ताब्यात घेण्यात आलेला सुलतान दिवान यास त्याचा साथीदार सुरज ठाकुर याचा सनावद परीसरात शोध घेतला असता तो मिळुन आला नाही . म्हणून सुलतान रशिदशाह दिवान यास गुन्ह्याचा पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे . तसेच नंदुरबार जिल्ह्यातील इतर मोटर सायकल चोरीचे गुन्हे देखील उघडकिस येण्याची शक्यता आहे . सदरची कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक गौरव सिंह , अपर पोलीस अधीक्षक , विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस हवालदार महेंद्र नगराळे , प्रमोद सोनवणे , गोपाल चौधरी , राकेश मोरे , शोएब शेख , रामेश्वर चव्हाण , अभय राजपुत , आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रवादी पक्षावर युवकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास : जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे

Next Post

अरे बापरे :जिल्ह्यात ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Next Post
नंदूरबार जिल्ह्यात रविवारी 44.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाच्या पाऱ्याची नोंद

अरे बापरे :जिल्ह्यात ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add