नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा जाती धर्माकडे पलीकडे जाऊन राजकारण करणारा पक्ष असुन विकासाचा मुद्द्यावर काम करतो त्यामुळेच आज युवावर्गाने राष्ट्रवादी पक्षावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी राष्ट्रवादी कांग्रेसच्या भटके विमुक्त जाती जमाती विभागाची बैठकीत केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी भटके विमुक्त जाती जमातीची बैठक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात करण्यात आला .यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भटके विमुक्त जाती-जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवार, जिल्हाध्यक्ष श्यामा पवार ,शहराध्यक्ष रूपा भरवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नितीन जगताप, कुणाल पवार,सोनू बजरंगे , डॉ अर्जुन चव्हाण,डॉ किसन चव्हाण,हेमराज राठोड,संदीप घमंडे, शिवाजी गावित व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा जाती धर्माकडे पलीकडे जाऊन राजकारण करणारा पक्ष आहे, विकासाचा मुद्द्यावर काम करणारा पक्ष आहे .राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत असा एकही नेता नाही की तो एका धर्माचा किंवा एका जातीच्या बोट धरून चालतो. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सर्वधर्मसमभाव पक्ष असून. आजच्या परिस्थितीत खासकरून युवावर्गाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला आहे. शरद पवार यांच्यावर विश्वास दाखवला आहे .म्हणून जास्तीत जास्त युवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्य करून खर्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्राची चळवळ उभी करावी असे आवाहन डॉ.अभिजीत मोरे यांनी बोलतांना व्यक्त केली. भटके विमुक्त जाती जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवार यांच्या मुंबई येथे उल्लेखनीय कार्याबद्दल शरद पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला ,याबद्दल डॉ अभिजित मोरे यांनी सांगितले की,नरेश पवार यांचे काम अतिशय उल्लेखनीय सुरू असून पक्षाने त्याच्यावर मोठी जवाबदारी दिली आहे ,त्याच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते हे राष्ट्रवादी पक्षाशी जोडले गेले.भविष्यात पक्ष मजबुतीसाठी अजून जोमाने कार्य करतील.यावेळी अनेक युवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला त्याचा सत्कार व स्वागत यावेळी करण्यात आले.








