नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील काकर्दा दिगर येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा कुहाडीने वार करत खून केल्याची घटना घडली.याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि,शहादा तालुक्यातील काकर्दा दिगर येथे येथील कालुसिंग खार्या भील रा. काकर्दे दिगर हा पत्नीवर चारित्र्यावर संशय घेत होता. कालुसिंग याला तीन मुले असून तिघी मुले बाहेर गावी गेल्याने त्याचा फायदा घेत दि. ५ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कालूसिंग याने कुर्हाड व मुसळीने पत्नी नर्मदाबाई (५५) हिस दुखापत केली. घटनेची माहिती पोलीस पाटील छोटू कोळी यांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलवत तिला पुढील उपचारासाठी शहादा येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मंगल कालुसिंग भील यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्या भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पतीला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी हे करीत आहेत.