नंदुरबार । प्रतिनिधी
तालुक्यातील रजाळे येथील 10 आदिवासी महिलांसह 3 इतर महिलांना शिवसेना नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आमदार कार्यालयात 13 लाभार्थ्यांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले आहे.
अनेक दिवसांपासून रेशनकार्डपासून वंचित असलेले तसेच काही विभक्त झालेल्या कुटूंबियांना रेशनकार्डचा लाभ देण्यात आलेला आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर पाटील यांनी पुरवठा विभागाशी वेळोवेळी पाठपुरावा करून लाभार्थ्यांना रेशनकार्ड प्राप्त झाले आहे.यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भारती हिरालाल भिल, सुशिलाबाई वसंत भिल, आक्का विठोबा भिल, ललिता राजु भिल, पार्वतीबाई साहेबराव भिल,दुर्गा ज्ञानेश्वर भिल, येलुबाई सुरेश भिल,सविता रणसिंग भिल, मिरा बारकु भिल,रूग्ण्याबाई दिलीप भिल,सरलाबाई रविंद्र कोळी, रूकसानाबी शरीफ खाटीक, वैशाली गोरख पाटील या 13 लाभार्थ्यांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र गिरासे, माजी कृऊबा सभापती किशोर पाटील, सरपंच, डॉ.शंकर पाटील, ग्रा.पं.सदस्य गुलाब भिल, जगतसिंग गिरासे, राजेंद्र गिरासे, केदारसिंग गिरासे आदी उपस्थित होते.तसेच गावात आणखीन वंचित असलेल्या नागरीकांनाही रेशनकार्डचा लाभ देण्यात येईल. असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान लाभार्थ्याना रेशनकार्ड हातात मिळताच चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनी माजी आ.रघुवंशी यांच्यासह रजाळे येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.